महाराष्ट्र 0 Comments 785 Likes       28 Jun 2017

तिच्या गुप्तांगात लाठी खुपसल्यमुळे तिचा मृत्यू

मुंबई - भायखळा तुरूंगातील महिला मृत्यू प्रकऱणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंजुळा मृत्यू प्रकऱणी 6 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजुळाच्या चांगल्या वर्तुवणूकेमुळे तिला वॉर्डन बनविण्यात आले होते. परंतू  23 जुन रोजी २३ जून रोजी सकाळी तिने दोन अंडी व पाच पाव कमी मिळाल्याची तक्रार तुरुंग प्रशासनाकडे केली. त्यानंतर तिला पोलिसांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर महिला पोलिसांनी तिच्या गुप्तांगात लाठी खुपसली होती व हेच तिच्या मृत्यूचे कारण ठरले.

   केवळ या एका घटनेमुळे तिला प्राण गमवावे लागले. तिच्या मृत्यूनंतर अन्य महिला कैद्यांनी जेलच्या छतावर चढून आंदोलन केले होते. त्यासर्व महिला कैद्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या महिला कैद्यांमध्ये शिना बोरा प्रकरणातील आरोपी इंद्रायणी मुखर्जीचाही समावेश आहे. २३ जून रोजी मंजुळा यांनी तक्रार केल्यानंतर तुरुंग अधिक्षिका मनिषा पोखरकर यांनी आपल्या खोलीत बोलावून घेतले. प्रत्यक्षदर्शींनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना सांगितले की, जेव्हा मंजुळा या खोलीबाहेर आली तेव्हा ती वेदनेने विव्हळत होती.  त्यानंतर तुरुंग सुरक्षादलाचे एक पथक महिला कैद्यांच्या बराकीत आले व त्यांनी पुन्हा मंजुळाला मारहाण करायला सुरूवात केली. त्यावेळी बराकीतील अन्य कैद्यांनी सांगितले की, मारहाण करणाऱ्यांमध्ये महिला कॉन्स्टेबल बिंदू नाईकडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंदे आदी सामील होत्या. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली.

प्रत्यक्षदर्शी माहितीच्या आधारे बिंदु आणि सुरेखा यांंनी मंजुळाचे पाय पकडले. आणि वसिमा शेख हातातील काठी तिच्या गुप्तांगात घातली. त्यानंतर मंजुळा रक्तबंबाळ अवस्थेत बराकीत पडलेली होती. यावेळी तुरूंग प्रशासन मात्र तिच्याकडे लक्ष दिले नाही. मंजुळा जेव्हा बाथरूमध्ये बेशुध्द आवस्थेत पडलेली होती तेव्हा निवासी डॉक्टराना बोलवण्यात  आले. डॉक्टरांनी मंजुळाला तत्काळ जेजे रूग्णालय़ात उपचाराशाठी दाखल करण्यासाठी सांगितले. जेव्हा जेजे रूग्णालयता दाखले केलें. मात्र उपचाराआधीचे तिचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर 13 जखमा असल्याचे समोर आले. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार सहा पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags :