महाराष्ट्र 0 Comments 456 Likes       27 Feb 2018

'इज्तेमा'वरुन परतणाऱ्या भाविकाच्या गाडीला अपघात, ५ ठार

सोलापूर - औरंगाबाद येथील इज्तेमा संपवून गावी परत निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला.
सोलापूरच्या शीतल हॉटेलजवळ ही घटना घडली. औरंगाबाद येथे मागील दोन दिवसांपासून मुस्लिम समाज बांधवांचा इज्तेमा सोहळा सुरू होता. सोमवारी या सोहळ्याचा समारोप झाला. त्यानंतर कर्नाटक आणि सोलापूर येथील मुस्लिम बांधव आपल्या गावी परतत असताना त्यांच्या जीपचा अपघात झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्यामुळे जीप पलटी झाली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags :