उस्मानाबाद 0 Comments 674 Likes       11 May 2018

बोगस ठराव प्रकरणी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना अभय

उस्मानाबाद - उस्मानाबाद नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यवृत्तांत नोंदवहीत ( प्रोसिडिंग बुक ) मध्ये बोगस  ठराव चिटकावल्या प्रकरणी संबंधित लिपिकास 'कारणे दाखवा' नोटीस  बाजवून  अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशिर कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना  बजावला आहे. मात्र जो दोषी आहे, त्यांच मुख्याधिकाऱ्याकडे आदेश  देण्यात आला असून,या प्रकरणात मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना 'अभय' देण्यात आला आहे. त्यामुळे  लवकरच वरिष्ठ  न्यायालयात अपिल दाखल करणार  असल्याचे  आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी उस्मानाबाद लाइव्हशी बोलताना सांगितले.

उस्मानाबाद नगर परिषदेचे सेवानिवृत्त उपअवेक्षक वसंत जनार्धन थेटे यांना कालबद्ध पदोन्नती देण्याबाबत कसलाही ठराव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला नसताना,  सन 2015 च्या ठराव क्रमांक 31 मध्ये हेराफेरी करण्यात आली होती. ठरावाचा कागद नोंदवहीत चिटकवण्यात आला होता. त्याची तक्रार सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली असता, उपविभागीय अधिकाऱ्याकडे चौकशी सोपवण्यात आली होती.चौकशीत  लिपिकासह मुख्याधिकारी  यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

या प्रकरणात नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि मुख्याधिकारी मुख्य दोषी असताना त्यांना  जिल्हाधिकाऱ्या कडून अभय देण्यात आले आहे . नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी  यांच्या संमतीशिवाय लिपिक ठरावाची प्रत प्रोसिडिंग बुक  मध्ये चिटकावू शकत नाही.जर लिपिकाने प्रोसिंडिग बुकामध्ये ठरावाची प्रत परसपर चिटकावली तर त्या ठरावावर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी सही कशी काय केली? लिपिकाबरोबर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध कारवाई करावी अन्यथा   लवकरच वरिष्ठ न्यायालयात अपिल दाखल करण्यात येईल , असे सुभेदार यांनी सांगितले. 

 

या पूर्वीच्या बातम्या वाचा

बोगस ठराव प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

नगर परिषदेच्या बोगस ठरावाची चौकशी सुरू ..

चौकशी समितीच्या पत्रास मुख्याधिकार्‍यांनी दाखवली केराची टोपली

 

 

Tags :