ताज्या बातम्या 0 Comments 208 Likes       04 Jul 2018

वृद्ध इसमास अपमानास्पद वागणूक

पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांची मुजोरी ...

भूम - उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम शहरात राहणाऱ्या रामेश्वर गुळवे यांची सून वर्षा नागेश गुळवे ही  काही दिवसांपूर्वी अचानक गायब झाली होती, यासंदर्भात भूम पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार देण्यात आली होती, तक्रार देवून बरेच दिवस झाले तरी सुनेचा पत्ता लागला नाही म्हणून रामेश्वर गुळवे हे 1 जुलै रोजी पोलीस स्टेशनमध्ये विचारपूस करण्यास गेले असता, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी, त्याच्या हातात बादली देवून कंपाऊंड बांधकामवर पाणी मारण्यास सांगितले, यावेळी गुळवे यांनी, काही बादल्या पाणी मारलेही, पण सूर्यवंशी यांनी भिंतीवर चढून पाणी मारण्यास सांगितले, यावेळी गुळवे यांनी मला वर चढता येत नाही म्हणताच सूर्यवंशी यांनी, अश्लील शिवीगाळ करून त्यांना  हाकलून दिले.

तक्रारची चौकशी करणे तर सोडा, पण तक्रारदारास काम करण्यास लावून अपमानास्पद वागणूक देवून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्याबद्दल संताप व्यक्त केला जातोय, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी रामेश्वर गुळवे यांनी केली आहे.

Tags :