उस्मानाबाद 0 Comments 154 Likes       05 Jul 2018

राईनपाडा हत्याकांडाचा नळदुर्गमध्ये रिपाई

नळदुर्ग - मुले पळवणारी टोळी समजून धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्याचा निषेध नळदुर्गमध्ये रिपाई युवा आघाडी, आणि  मानवी हक्क संरक्षण संघ भारत यांच्या वतीने करण्यात आला..

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवे गावातील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील  काही जण पोटापाण्यासाठी राईनपाडा गावात गेले असता, त्यांना गावकऱ्यांनी मुले पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण केली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता.

हत्या करणाऱ्या आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. यावेळी रिपाई युवा आघाडी आणि  मानवी हक्क संरक्षण संघ भारत संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Tags :