उस्मानाबाद 0 Comments 171 Likes       30 Jul 2018

राष्ट्रवादीचा पालकमंत्र्यांना घेराव

उस्मानाबाद  - खरीप २०१७ च्या हंगामात उस्मानाबाद व लोहारा तालुक्यात शेतकरी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. पीक कापणी प्रयोगात मंडळ घटक घेणे आवश्यक असताना तालुका घटक घेतल्यामुळे ७५००० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वंचित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अनुदान न देता  पिकविम्याची पूर्ण रक्कम मिळावी यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सलग सहा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धरणे आंदोलन करण्यात आले होते.

आ.राणाजगजितसिंह पाटील  यांनी देखील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न लावून धरला होता. त्यांच्या मागणीप्रमाणे कृषिमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन नागपूर कृषी मंत्र्यांच्या दालनात दि.१३/७/२०१८ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीस कृषीमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, कृषी राज्यमंत्री . सदाभाऊ खोत,आ.राणाजगजितसिंह पाटील, आ.सुजितसिंह ठाकूर, आ.ज्ञानराज चौगुले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह , अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे श्री.डी.डी.डांगे, सांख्यिकी विभागाचे श्री.उदय देशमुख, कृषी सह सचिव श्री जोशी, अवर सचिव श्री घाडगे, अधीक्षक कृषी अधिकारी श्री.घाटगे आदी उपस्थित होते.

या बैठकीत आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी पीक कापणी प्रयोगातील त्रुटी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. या चुकीची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय बैठकी मध्ये घेण्यात आला.प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचे मूळ निकष न पाळता राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित केला, हे देखील बैठकी दरम्यान स्पष्ट झाले. जिल्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या चुकांचा फटका थेट ७५००० शेतकऱ्यांना पोहोचला. त्यामुळे पिक विमा कंपनी पेक्षा शासनाची जबाबदारी अधिक असल्याबाबत देखील चर्चा झाली.

या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांवर झालेला अन्याय लक्षात घेवून कृषिमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी आठ दिवसात मदत व पुनर्वसन विभागाकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करतो, असे आश्वासन या बैठकीमध्ये दिले होते. परंतु आठ दिवस उलटून गेले तरी त्याबाबत कांही कारवाई होत नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अर्जुन खोतकर साहेबांना आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दि.१९/७/२०१८ रोजी पत्र लिहून उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान नव्हे तर  त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा व मदत व पुनर्वसन मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत शासनाची भूमिका दि.२२/७/ २०१८ जाहीर करावी व निधी वितरित होण्याची तारीख जाहीर करावी अशी मागणी केली होती.तसेच याबाबत कांही सकारात्मक कार्यवाही झाली नाही तर घेराव घालण्याचा इशारा दिला होता.

परंतु तरी देखील याबाबत अद्याप कसलीच कार्यवाही झालेली नसल्याने आज पालकमंत्री ना.अर्जुन खोतकर  जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यासाठी उस्मानाबाद येथे आले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७०० हुन अधिक  कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात पालकमंत्री आले असता त्यांना घेराव घालून  आपलं निवेदन दिले.याप्रसंगी जिल्हापरिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी आम्हाला पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी प्रति हेक्टरी अनुदान न देता  पिकविम्याची पूर्ण रक्कम देण्यात यावी अशी आग्रही मागणी धरत या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने बाजू मांडली.

त्यावर पालकमंत्र्यांनी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत माझी दोन दिवसांपूर्वी या विषयाबाबत चर्चा झाली असून मदत व पुनर्वसन मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोबत देखील याच अनुषंगाने बोलणी झाली असून या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी येत्या दोनतीन दिवसात विमा कंपनीवर दवाब आणून तो देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.जर याबाबत कांही अडचण आली तर शासन विशेष बाब म्हणून उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील पिकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पिकविम्याची पूर्ण रक्कम ७० कोटींची मदत देण्यास कटिबद्ध असल्याचे आंदोलनकर्ते शेतकरी व कार्यकर्त्यांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस व आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच आजच्या घेराव आंदोलनानंतर पालकमंत्र्यांनी शासनाच्या वतीने प्रति हेक्टरी अनुदानाऐवजी पिकविम्याची पूर्ण रक्कम ७० कोटी देण्याबाबत आज जाहीर केलेल्या भूमिकेमुळे या दोन्ही तालुक्यातील पिकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख,,  पं.स.सभापती बालाजी गावडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, प्रदेश सचिव शेख मसूद, तालुकाध्यक्ष गफ्फार काझी, बाजार समितीचे सभापती अरुणपापा वीर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन उद्धवराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक , भारत डोलारे, पं.स.उपसभापती शामभैय्या जाधव, न.प.गटनेते युवराज नळे, टिकले गुरुजी, दत्ता देवळकर,राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, ओम मगर, संजय पाटील, संजयकाका लोखंडे, अनंतराव देशमुख, अब्दुल बारीसाहेब काझी, राजाराम कोळगे, शंकर आंबेकर, पृथ्वीराज कोचेटा, राजाभाऊ पाटील, नाना कदम, रामचंद्र लोमटे पाटील, नगरसेवक अभय इंगळे ,प्रदीप मुंडे, प्रा.चंद्रजीत जाधव, मनोज रणखांब, आशिष नायकल, निहाल काझी, दत्तात्रय देशमुख, बाळासाहेब घुटे, झुंबर बोडके, नवनाथ नाईकवाडी, संदीप साळुंके, नागप्पा पवार, बाळासाहेब कदम, राजाभाऊ सोनटक्के, युवराज ढोबळे, राजाभाऊ समुद्रे, भास्कर माळी, इसूब शेख, प्रदीप वीर, मच्छिंद्र रसाळ, दिलीप सोलंकर, गोपाळ कदम, नवाब शेख, राजेसाहेब देशमुख, शाम तेरकर, सलीम शेख, अनिल शिंदे, गफूर शेख, प्रमोद देशमुख, बालाजी पांढरे, पप्पू वाकुरे, विजय हाजगुडे  यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Tags :