उस्मानाबाद 0 Comments 152 Likes       18 Aug 2018

पकड वारंट असलेल्या आरोपीस सोडले

जुगारी पकडले पण रुपये खिशात घातले

उस्मानाबाद - न्यायालयीन खटल्यात वारंवार समन्स बाजवून गैरहजर राहिलेल्या आरोपीस न्यायालय पकड  वारंट बजावते, त्याची अंमलबाजवणी करण्याचे काम पोलिसांचे असते, पण पोलीस आरोपीस कसे मॅनेज होतात, हे समोर आले आहे.

आनंदनगर पोलिसांनी १०  ऑगस्ट रोजी सायंकाळी  पकड  वारंट असलेल्या एका आरोपीस पकडले  , त्याला दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्याला कस्टडीत डांबण्यासाठी जिल्हा  रूग्णालयात मेडिकल करण्यासाठी नेण्यात आले, मेडिकलही करण्यात आले, त्यानंतर परत पोलीस स्टेशनमध्ये आणले असता, आता पोलीस स्टेशनमधून सुटका करून परस्पर न्यायालयात पकड वारंट रद्द करण्यासाठी आरोपी आणि पोलीस यांच्यात डील सुरु झाली. दोन पोलीस साहेबाकडे गेले  सावज टप्यात आल्याचे सांगितले. अखेर १० हजार घेऊन त्या आरोपीस सोडून देण्यात आले. दुसऱ्या दिवशी तो आरोपी न्यायालयात हजर राहून परस्पर वारंट रद्द केला. आरोपीस पोलिसांना का सापडत नाहीत ? त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

नूतन पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी या प्रकरणी संबंधित पोलिसांवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष वेधले आहे.

जुगारी पकडले पण रुपयावर डल्ला

त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी आनंदनगर पोलिसांनी पोलिसांनी शिंगोली येथील एका जुगार अड्ड्यावर धाड मारली होती. त्यात तीन शिक्षक सापडले होते, त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन सोडण्यात आले आणि किरकोळ आरोपीना अटक करण्यात आली. तसेच २९ हजार घटनास्थळी सापडले असता, ४ हजार दाखवण्यात आले आणि उर्वरित २५ हजार खिशात घालण्यात आले. तसेच मुद्देमाल जास्त दिसावा यासाठी आरोपींच्या दुचाकी दाखवण्यात आल्या.

दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धड मारून कशी कर्तबगारी केली, याची बातमी झळकली पण डल्ला कसा मारला हे छापून आले नाही.

Tags :