महाराष्ट्र 0 Comments 108 Likes       29 Aug 2018

तुळजापूर ते चौंडी पदयात्रेचा समारोप

अहमदनगर  - भाजप सरकार चलेजाव चा नारा देत ज्यांनी धनगर समाजाला आरक्षणाबाबत शब्द दिला होता त्यानि आज फसवणूक केली अशा गोड बोलून धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकार ला सत्तेतून पाय उतार करूयात आणि या पुढे मौन धरून ठिय्या आंदोलन करूयात अशी भूमिका धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती चे मुख्य समन्वयक सुरेश कांबळे यांनी  आज अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी केले

धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाण पत्र मिळावे तसेच चौंडी च्या निरापधारावरील गुन्हे मागे घेण्यात यावे आणि धनगर आरक्षणासाठी आत्महत्या  केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मदत देऊन कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी याकरिता धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने भाजप सरकार चले जाव अशी तुळजापूर ते चौंडी पदयात्रा काढण्यात आली होती .

तिचा आज अहमदनगर जिल्ह्यातील पुुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मगावी पदयात्रेेचा समारोप झाला आणि धनगर समाजाच्या  आरक्षणासाठी  यापुढे मौन धारण करून ठिय्या आंदोलनाची भूमिका घेतली. 

Tags :