उस्मानाबाद 0 Comments 1611 Likes       07 Oct 2018

उस्मानाबादसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ?

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे चाचपणी करत आहेत. उस्मानाबाद मतदार संघासाठी आज चर्चा होणार आहे. माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांचे वय लक्षात घेता त्यांना आता विश्रांती मिळू शकते. त्यांच्या ऐवजी बार्शीचे आमदार दिलीप सोपल किंवा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होवू शकते.

शरद पवार यांचे जुने सहकारी म्हणून डॉ पद्मसिंह पाटील ओळखले जातात. जिकडे शरद पवार तिकडे डॉ पद्मसिंह पाटील हे आजवरचे गणित आहे. मागील लोकसभा निवडणुकीत  पद्मसिंह पाटील यांचा दारुण पराभव झाला होता. शिवसेनेचे उमेदवार  प्रा. रवींद्र गायकवाड विक्रमी मतांनी निवडून आले होते.

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीत उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीकडे आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत डॉ पद्मसिंह पाटील यांना  विश्रांती मिळू शकते. त्यांच्या ऐवजी  बार्शीचे आमदार दिलीप सोपल किंवा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होवू शकते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जीवनराव गोरे यांचे नांव देखील ऐनवेळी पुढे येऊ शकते..

डॉ पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या हातात पक्षाची धुरा आहे. ते ज्यांची शिफारस करतील तेच नाव फायनल होऊ शकते. त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी कोणाची निवड होणार ? याबाबत औत्सुक्य आहे. 

Tags :