ताज्या बातम्या 0 Comments 159 Likes       07 Oct 2018

आदिलशाहीची अस्सल सनद सापडली

पाचशे वर्षांपूर्वीची सनद

तुळजापुरात पाचशे वर्षांपूर्वीची आदिलशाहीची अस्सल सनद सापडली आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिराला इजा पोहचवू नये, तेथील पुजार्‍यांना त्रास देवू नये, मंदिराचे नुकसान करू नये, असा स्पष्ट उल्लेख त्यात आहे.

आदिलशाहीचा संस्थापक युसूफ आदिलशहा याने हिजरी ९१० म्हणजेच १४८९ साली तुळजापूरसाठी दोन महत्वाच्या सनद दिलेल्या आहेत. तुळजापूर येथील पुजारी विलास वाळके यांच्या घरी १९७१ साली घराचे बांधकाम करताना जुन्या बांधकामात ही सनद सापडली. घराच्या भिंतीत एका संदुकमध्ये ही सनद जपून ठेवण्यात आली होती. एक सनद १ फूट आकाराची तर दुसरी तब्बल ७.२ फूट लांबीची आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख प्रमाणपत्र धारकांकडून यातील मोडी लिपीचे मराठी भाषांतर करून घेण्यात आले आहे. औरंगाबाद येथील उच्च न्यायालयातील एका प्रकरणातही ही सदर वापरण्यात आली आहे.

महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठ असून तुळजाभवानी हे मुख्य शक्तीपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता असलेल्या तुळजाभवानीचे अनेक पुरातन दाखले आणि अलंकार तुळजापुरात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आदिलशाहीची अस्सल सनद.

Tags :